मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात जात नव्हते. मात्र आता ते मंत्रालयात नियमित येत असून मंत्रालयाच्या आवारात प्रवेश करताच दोन महापुरुषांचे दर्शन घेतल्याशिवाय ते आपल्या कार्यालयात जात नाहीत. मुख्यमंत्री ( Chief Minister Uddhav Thackeray ) मंत्रालयात प्रवेश ( Enters in Mantralaya ) करताच सर्वप्रथम प्रवेशद्वारा शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) प्रतिमेला वंदन करतात. त्यानंतर शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या प्रतिमेला वंदन करूनच ते आपल्या कार्यालयात जातात. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा नेहमीचा शिरस्ता आहे. मंत्रालयात आल्यानंतर एकही दिवस या दोन महापुरुषांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांनी कामकाजाला सुरुवात केली नसल्याचे पाहायला मिळते.
केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून व्यक्त :छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर महापुरुषांचे विचार आपल्या भाषणांमधून मांडताना आणि वारंवार त्यांचा उल्लेख करताना आपण अनेक नेत्यांना पाहतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ भाषणा पुरते महापुरुषांचे स्मरण करत नाहीत, तर दररोज त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय कामकाजाला सुरुवात करत नाहीत. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.