महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Important Meet : विरोधकांना जशास तसे उत्तर द्या.. मुख्यमंत्र्यांचे आमदार, मंत्र्यांना आदेश - उद्धव ठाकरे शिवसेना मंत्री आमदारांची बैठक

केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे शिवसेनेच्या नेत्यांवर सातत्याने कारवाई होत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी शिवसेनेची महत्वाची बैठक बोलावली ( Shivsena Important Meet ) होती. या बैठकीत शिवसेनेचे आमदार आणि मंत्री सहभागी झाले. विरोधकांना जशाच तसे उत्तर देण्याचे आदेशच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री आणि आमदारांना दिले आहेत.

विरोधकांना जशास तसे उत्तर द्या.. मुख्यमंत्र्यांचे आमदार, मंत्र्यांना आदेश
विरोधकांना जशास तसे उत्तर द्या.. मुख्यमंत्र्यांचे आमदार, मंत्र्यांना आदेश

By

Published : Mar 23, 2022, 6:53 PM IST

Updated : Mar 24, 2022, 8:25 AM IST

मुंबई- शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे सातत्याने कारवाई होत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी शिवसेनेची महत्वाची बैठक बोलावली ( Shivsena Important Meet ) होती. या बैठकीत शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्री सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांची जेवणाचा बेतही आखण्यात आला होता. भाजपकडून सातत्याने टार्गेट करण्यात येत असल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांना आक्रमक होण्याचा संदेश दिला आहे.

विरोधकांना जशास तसे उत्तर द्या.. मुख्यमंत्र्यांचे आमदार, मंत्र्यांना आदेश

सायंकाळी १० च्या सुमारास ही बैठक संपली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार मंत्र्यांची बैठक संपली असून, बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे. राज्य सरकारतर्फे करण्यात येत असलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा. विरोधकांकडून होणाऱ्या टीका-टिप्पणीला जशाच तसे उत्तर देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

विरोधकांना जशास तसे उत्तर द्या.. मुख्यमंत्र्यांचे आमदार, मंत्र्यांना आदेश
Last Updated : Mar 24, 2022, 8:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details