मुंबई -मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मी मीडियाच्या माध्यमातून जगभरातील स्थिती पाहत होतो. मीडियातील बातम्यांवरून कोरोना संकटाचा अंदाज आला. लष्कर मागवावे लागते की काय असा प्रश्न मनात येत होता. सुरुवातीच्या काळात माझ्यावरही दडपण होते. पण, मी खचलो नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनद्वारे आयोजित 'पत्रकार कोव्हिड योद्धा' पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना, मार्चमध्ये मुंबई, पुण्याला आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण सापडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मला माहिती यायला सुरुवात झाली की, रुग्ण वाढत आहेत.मेडिकल हॉस्पिटलची कमतरता कमी जाणवत होती. रुग्णालयांची गरज पडणार अस वाटलं. त्यामुळे हॉस्पिटलची व्यवस्था वाढवली. आपण कोरोनावर उपचार करणारे देशातच पहिलं हॉस्पिटल उभारलं. टास्क फोर्स सुरु केला असे मुख्यमंत्री म्हणाले.कोरोनाच्या सुरुवातीला मी सर्वांना सांगत होतो की घराबाहेर पडू नका. त्याकाळात मीसुद्धा कमीत कमी वेळा घराबाहेर पडलो. त्यावरुन माझ्यावर टीका देखील झाली. पण पहिले दोन महिने आम्ही सगळेजण पहाटेपर्यंत जागी असायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व ठिकाणांचा आढावा घेत होतो.
पत्रकारांनाही कोरोनाची लागण -
कोरोनाकाळात अनेक पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली. रुग्णालय कमी पडत होते, रुग्णवाहिकांचा तुटवडा होता, डॉक्टर्स नव्हते, औषध तर अजूनही आलेलं नाही, पीपीई किट नाही, एन-95 मास्क नाही, एकदम तारांबळ उडाली होती. पण सुदैवाने कोविड योद्धे म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत आलात, जे वास्तव आहे ते जनतेपर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचवत आलात. तसेच आपले पोलीस, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनी चांगले काम केले असे गौरवउद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
तेव्हा केंद्राने ऐकले नाही -