महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 21, 2021, 4:32 PM IST

ETV Bharat / city

वनरक्षक ढुमणेंच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबीयाप्रति संवेदना प्रकट केली आहे.

वनरक्षक स्वाती ढुमणे
वनरक्षक स्वाती ढुमणे

मुंबई - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत, तसेच पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ढुमणे यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांत्वन केले आहे.

१५ लाखांची मदत

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबीयाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details