महाराष्ट्र

maharashtra

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्टच्या २६ इलेक्ट्रीक बसेसचे लोकार्पण

By

Published : Dec 4, 2020, 7:31 AM IST

मुंबईसारख्या शहर भागात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात टाटा मोटर्सने बनवलेल्या वातानुकूलित २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. यातील २६ नवीन एसी इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

best
बेस्ट

मुंबई- शहरातील पर्यावरणाचे रक्षण करता यावे, म्हणून बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २६ नवीन एसी इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

नरिमन पॉईंट, मुरली देवरा चौक या ठिकाणी या बसगाड्यांचे लोकार्पण होणार आहे. याप्रसंगी, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

३५० इलेक्ट्रीक बसेस होणार दाखल -
मुंबईसारख्या शहर भागात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात टाटा मोटर्सने बनवलेल्या वातानुकूलित २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात यापूर्वी बेस्टच्या मालकीच्या ६ इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल आहेत. तसेच, त्याव्यतिरिक्त भाडे तत्त्वावरील ६६ इलेक्ट्रिक बसगाड्याही दाखल झालेल्या आहेत. एकूण ३५० इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना प्रदूषणमुक्त प्रवास करायला मिळणार आहे. तसेच, इंधनाची बचत होणार आहे.

प्रवाशांची संख्या -
बेस्टच्या बसमधून एकेकाळी ४३ लाख प्रवासी प्रवास करायचे. वाहतूक कोंडी, शेअर रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर यासारख्या वाहतुकीच्या साधनांमुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या २८ लाखांवर आली होती. कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यावर अत्यावश्यक सेवेतील अडीच लाख कर्मचारी बसमधून प्रवास करत होते. मुंबईकरांना ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी परवानगी नसल्याने प्रवासासाठी बेस्ट बसचा उपयोग केला जात आहे. यामुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या १८ लाखावर पोहचली आहे.

हेही वाचा -दिल्ली मार्च : किमान आधारभूत किमतींना हात लावणार नाही - केंद्रीय कृषीमंत्री

हेही वाचा -दिल्ली मार्च : सरकारसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details