महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Shinde PFI Ban : 'पीएफआय'वर बंदी, मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार - केंद्रिय गृहमंत्री पीएफआय संघटनेवर बंदी

देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या (banning PFI organization) केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले (Chief Minister thanks Union Home Minister0 आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Sep 28, 2022, 11:06 AM IST

Updated : Sep 28, 2022, 11:14 AM IST

मुंबई -देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या (banning PFI organization) केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले (Chief Minister thanks Union Home Minister) आहे.


पीएफआय गुन्ह्यांमध्ये सहभागी -पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले (Union Home Minister banning PFI organization) आहे.

समाजकंटकांचे मनसुबे यशस्वी होणार नाही -महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी पीएफआय वरील बंदीचे पुन्हा एकदा स्वागत केले (Union Home Minister banning PFI organization)आहे.

Last Updated : Sep 28, 2022, 11:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details