मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर ( Uddhav Thackeray Brother In Law Shridhar Patankar ) यांच्या ठाण्यातील 11 फ्लॅट साधारणता 6 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर आता श्रीधर पाटणकर यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता ( Shridhar Patankar ED Enquiry ) आहे. श्रीधर पाटणकर यांना विनातारण कर्ज देणारा कथित हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी फरार असून, त्याच्या शोधात ईडी लागली आहे. मात्र, आता ईडी श्रीधर पाटणकर यांना चौकशीला कार्यालयात बोलवण्यासाठी समन्स देखील जारी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली ( ED Summons Shridhar Patankar ) आहे. त्यामुळे श्रीधर पाटणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना विरुद्ध ईडी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्रीय यंत्रणा हा सामना रंगला आहे. यावेळी केंद्रीय यंत्रणेने हे मातोश्रीचे संबंधित व्यक्तीवर कारवाई केल्याने हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. आता श्रीधर पाटणकर यांना चौकशी करिता समन्स देखील जारी करण्यात येणार असून, त्यांची चौकशी करण्याकरता कार्यालयात बोलावण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध ईडी सामना रंगणार आहे.
११ सदनिका केल्या आहेत जप्त : पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीतील पुष्पक बुलियन विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ईडीकडून चतुर्वेदीचा शोध सुरू आहे. चतुर्वेदीने हमसफर डिलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांचे विनातारण कर्ज पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले. चतुर्वेदीशी संगनमत करून हा पैसा महेश पटेल याने लाटला आणि तो श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीच्या बांधकाम प्रकल्पात गुंतविण्यात आला. ईडीने पाटणकर यांच्या निलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका जप्त केल्या आहेत.