महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mamata Banerjee meet Aditya Thackeray : ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात झाली अर्धा तास चर्चा - ममता बॅनर्जी मुंबई महाराष्ट्र दौरा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamata Banerjee) दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) आहे. सायंकाळी साडेसात वाजता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) आणि शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे ममता बॅनर्जींचे स्वागत करताना
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे ममता बॅनर्जींचे स्वागत करताना

By

Published : Nov 30, 2021, 8:52 PM IST

Updated : Nov 30, 2021, 9:23 PM IST

मुंबई -पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamata Banerjee) दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) आहे. सायंकाळी साडेसात वाजता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) आणि शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांची देखील भेट घ्यायची होती. मात्र मुख्यमंत्र्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मुख्यमंत्री अद्यापही बायोबबलमध्ये असल्यामुळे त्यांची भेट ममतादीदींशी होऊ शकली नाही, अशी माहिती भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. या तीनही नेत्यांमध्ये मुंबईमधील ट्रायडेंट हॉटेल ( Trident Hotel ) येथे जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, ममता बॅनर्जी जेव्हाही मुंबई दौर्‍यावर असतात त्यावेळेस उद्धव ठाकरे हे त्यांची भेट घेतात. मात्र त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि ते स्वतः बायोबबलमध्ये असल्याकारणाने ही भेट होऊ शकलेली नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. महत्वाच्या प्रत्येक मुद्द्यावर ह्या दोन्ही राज्यात संवाद होत असतो. खास करून कोविड परिस्थितीमध्ये देखील या दोन्ही राज्याने चांगला सुसंवाद ठेवला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया देतांना मंत्री आदित्य ठाकरे
  • ममता दीदींचा दोन दिवसीय मुंबई दौरा

पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज (मंगळवारी) सायंकाळी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल. तसेच शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकावर जाऊन दर्शन घेतले. अनेक वेळा आपण मुंबईला आलो होतो. मात्र त्यावेळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेता आले नाही. मात्र यावेळी आवर्जून आपण सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती लवकर बरी होऊ दे, अशी प्रार्थना आपण देवाकडे केली असल्याचे यावेळी ममता बॅनर्जी म्हणाले. तसेच "जय बंगाल, जय महाराष्ट्र" अशी घोषणाही त्यांनी यावेळी दिली. तसेच उद्या (बुधवारी) एक डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ही आपण भेट घेणार असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिली.

हेही वाचा -Mamta Banerjee Mumbai Visit : उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट नाहीच, आदित्य ठाकरेंची घेणार भेट

Last Updated : Nov 30, 2021, 9:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details