ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

26/11 Attack : मुंबईवरील हल्ल्यातील वीर शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन - 26/11 Attack

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या (the heroic martyrs) शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना (Chief Minister greets ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
author img

By

Published : Nov 26, 2021, 2:13 PM IST

मुंबई: २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना (the heroic martyrs)आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना(Chief Minister greets) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. सर्वांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना प्रकट करून वीर शहीदांसह तसेच हा हल्ला परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.


मुंबईवर झालेला दशहतवादी हल्ला हा भारताच्या आर्थिक राजधानीवरील हल्ला दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता. देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न मुंबईकरांनी उधळून लावला. त्यामध्ये मुंबई पोलीसांनी शौर्याची परिसीमा गाठली. केवळ मराठीच नव्हे तर, संबंध भारतीय मनोधैर्य एकवटले. वीर जवान तुकाराम ओंबळे यांनी निशस्त्र असतानाही क्रूरकर्मा दहशतवाद्याला जेरबंद करण्यासाठी बलिदान पत्करले. पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी गोळ्या झेलून, अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या शौर्य, धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भ्याड हल्ल्यांना भीक न घालण्याची, आव्हानांवर मात करण्याचे मनोधैर्य आणखी उंचावेल ते पुढच्या पिढ्यांमध्ये विकसित व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आणि निष्पाप बळींना हीच आदरांजली ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details