महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Eknath Shinde Meet Leeladhar Dake : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीलाधर डाकेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण - CM Eknath Shinde visit Leeladhar Dake

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. खासदार गजानन कीर्तिकर ( MP Gajanan Kirtikar ) यांच्याभेटीनंतर आता हाडाचे सैनिक आणि बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढीचे काम करणाऱ्या लीलाधर डाके यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

CM Shinde Dhake visit
मुख्यमंत्री शिंदे डाके भेट

By

Published : Jul 28, 2022, 4:51 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना ( Shiv Sena ) कोणाची यावरून राजकीय घमासान सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. खासदार गजानन कीर्तिकर ( MP Gajanan Kirtikar ) यांच्याभेटीनंतर आता हाडाचे सैनिक आणि बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढीचे काम करणाऱ्या लीलाधर डाके यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटीत वाढ -एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्या विरोधात बंड पुकारले. सेनेच्या ४० आमदारांनी आणि बारा खासदारांनी त्यांच्या बंडाला पाठिंबा दिला. राज्यभरातून अनेक सेनेचे पदाधिकारी शिंदे गटात ( Shinde group ) सामील होत आहेत. शिवसेना आमची असल्याचा दावा शिंदे गटाकडून आता केला जातो आहे. शिवसेनेने बंडखोरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच निवडणूक आयोगाने कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आता चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत.

भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके ( Senior leader Leeladhar Dake ) यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. शिवसेना वाढवण्यासाठी लीलाधर डाके यांचे योगदान खूप जवळून पाहिल आहे. शिवसेनेच्या उभारणीच्या काळात जी काही ठराविक मोजकी माणसे बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होती, त्यामध्ये डाके यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. डाके यांचे आनंद दिघे ( Anand Dighe ) यांच्यासोबत देखील घनिष्ठ संबंध होते. यंत्र, तंत्र हे सर्व आज आहे. पण त्यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढीसाठी डाके यांनी काम केले, असे मुख्यमंत्री शिंदे सांगितले. तसेच आजही शिवसेना आहे त्यात डाके यांचे योगदान फार मोलाचे असल्याचे म्हणाले.

गजानन कीर्तिकरांची भेट घेणार -मागील आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे शिंदे म्हणाले होते. आज लीलाधर यांची भेट घेतली. संध्याकाळी मनोहर जोशी ( Manohar Joshi ) यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला ( Shiv Sena National Executive ) ब्रेक करण्याच्या हालचाली शिंदेकडून सुरू झाल्याचे बोलले जाते.

हेही वाचा -Kalamma Waterfall In Kolhapur : निसर्गाने बहरलेला 'काळम्मा धबधबा' वेधतोय पर्यटकांचे लक्ष; पाहा निसर्गाचा अनमोल ठेवा

ABOUT THE AUTHOR

...view details