मुंबई :राज्यातील सत्तानाट्याचा काल शेवट होऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची ( Eknath Shinde CM ) शपथ घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ( Devendra Fadnavis Deputy CM ) घेतली. आज मंत्रालयात पोहचताच मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar ) यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन ( Greetings by offering flowers ) केले.
सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना : मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, "आपण नवीन सुरुवात करीत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकासकामे, विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते, ही एका रथाची दोन चाके आहेत. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायचा आहे. मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, "आपल्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राच्या विकासाला गतिशीलता देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्रातील प्रकल्प, विकास माॅडेल यांच्याबाबत योग्य निर्णय घेऊन महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करूया." मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीकपाणी, पीकविमा तसेच कोबीबाबतची परिस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले.