मुंबई - बदलत्या वातावरणामुळे जीवनमानावर विपरीत परिणाम होत आहेत. सध्याच्या काळात ऑक्सीजन पेक्षा ओझोन महत्वाचा ( Ozone is more important than oxygen) आहे. ओझोन नसेल तर जीवन जगणे मुश्किल होईल. देशात जल, वायू परिवर्तन, मानव संसाधनावर मोठे संकट आहे. संपूर्ण जग यामुळे चिंतेत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जन आंदोलन, चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी मांडले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात जागतिक ओझोन दिवसानिमित्त ( World Ozone Day ) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय पर्यावरण मंत्री, वने व वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थिती होते.
ओझोन का महत्वाचा: ओझोनचा थर हा सुर्याच्या हानीकारक किरणांपासून आपले संरक्षण करतो. वातावरणात एक संतुलन राखून ठेवण्याचे काम करतो. प्रदुषणामुळे दिवसेंदिवस ओझोनचा थर कमी होत असून जगभरात हा चिंतेचा विषय बनला आहे. मानवी जीवनावर देखील प्रतिकूल परिणाम होत आहे. ओझोनचा थर घटत असल्याने जनजागृतीची गरज आहे. ओझोनच्या कमतरतेमुळे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेंट चेंज तसेच इको सिस्टीमवर परिणाम होत आहे. कधी पाऊस येतो तर कधी पाऊस गायब होतो. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपण सर्वांनी उर्जेची बचत केली पाहिजे. याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पर्यावरण पूरक वस्तू वापरणे आवश्यक - मुख्यमंत्री:आजच्या या जागतिक ओझोन दिवसा निमित्त पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जंगल, वने नष्ट होत आहेत. ती टिकवण्यासाठी जमिनी आरक्षित करणार आहे. सर्वांनी यासाठी सहकार्य करावे. पर्यावरण संवर्धनासाठी जनआंदोलनाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पर्यावरण घडवू. महाराष्ट्रही त्यास सहकार्य करेल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. ओझोन आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा घटक आहे. याबाबत जागृती निर्माण करणे गरजेचे आहे, त्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. भावी पिढ्यांसाठी ओझोन थरांचे रक्षण करणे चालू ठेवले पाहिजे. यासाठी पर्यावरण पूरक वस्तू वापरणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ओझोनचे रक्षण करणे आपली जबाबदारी :आज जागतिक ओझोन दिवस. ओझन हा इतर वायूप्रमाणेच निसर्गात आढळणारा एक नैसर्गिक वायू आहे. इतर वायू प्रमाणेच तो नैसर्गिक रित्या तयार ही होतो आणि नष्टही होतो. या ओझोनचा जमिनीपासून सुमारे १५ ते ३० किमी एक थर किंवा त्याचा जास्तीत जास्त प्रमाण या ठिकाणी आढळतो, ते साधारणता ९० टक्के आहे. हा ओझोन सूर्यपासून येणारे अतिनीलकिरणांपासून जे काही हानिकारक आहे. या अतिनीलकिरणांना रोखून एक आपल्या मानवजातीस उपकारक ठरतो. या अतिनीलकिरणांमुळे आपणास त्वचेचे विकार, कॅन्सर, ह्युमन सिस्टीम बिघडणे यांसारखे अनेक विकार होऊ शकतात. तथापि औद्योगिकीकरणामुळे वातावरणात उत्सर्जित होणारे विविध प्रकारचे गॅसेस, नॅट्रोजन आणि त्याचे ओक्ससाईड यामुळे या ओझोनचे विघटन होते. विघटन झाल्याने सूर्यापासून येणारे अतिनील किरणे रोखले जातात. त्यापृथ्वीवर आल्यास आपल्याला त्याची हानी होऊ शकते. तर असा हा उपकारक ओझोन जो समस्त प्राणिजातीस आणि मानवजातीस अतिशय उपकारक आहे, त्याच रक्षण करणे आपली जबाबदारी आहे, अशी माहिती असोसिएट व्हाईस प्रेसिडन्टचे डॉ.मोरे यांनी दिली.