मुंबई -शिवसेनेतून ( Shiv Sena ) बाहेर पडून कोणताही नेते निवडून येत नाही. खास करून जे नेत्यासोबत गेलेले आमदार किंवा इतर पदाधिकारी निवडून येत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे असे सभागृहाचे भाषण करताना महाराष्ट्र नेते, आमदार अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले. मात्र, माझ्यासोबत आलेल्या शिवसेनेचे 40, तसेच 11 अपक्ष आमदारांना निवडून आणायची जबाबदारी माझी आहे. अशी, प्रतिज्ञा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सभागृहात घेतली. विधानसभेच्या आपल्या भाषणादरम्यान त्यांनी हे मत व्यक्त केलं. शिवसैनिकांना देखील माहिती आहे की, आम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळे सर्वांना निवडून पुन्हा निवडून आणण्याचे जबाबदारी मी घेतो अशी प्रतिज्ञा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.
भाजप सोबत दोनशे जागा निवडून आणू -येणाऱ्या काळात तुम्हाला 50 आमदारांना आणणार नाही. तर, भारतीय जनता पक्ष तसेच आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे जागा निवडून आणू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आम्ही शिवसेना पासून हिंदुत्वाचा पुरस्कार करत आहोत. त्यामुळे शिवसेनेचे आमच्या सोबतच राहतील. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर यांचा विचार आणि पुढे घेऊन चाललो आहोत अस मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
भाजप शिंदे गटाचे सरकार राज्यात स्थापन -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सरकारमधील विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy CM )यांनी त्यांच्या अभिनंदनचा ठराव सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपा युतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्याचे जाहीर केले हा जनतेच्या मनातला कौल होता आम्हाला दूर सारून विचित्र आघाडी करण्यात आली मात्र शेवटी जनतेच्या मनातील सरकार आज स्थापन होत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते विश्वास दर्शक ठराव संमत झाल्यानंतर अभिनंदनच्या ठरावावर ते बोलत होते