मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच संबंधित मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सब कमिटीची बैठक पार पडली. यावेळी सरकारकडून तत्काळ दहा हजार कोटींची मदत जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा फोटो काढून पाठवल्यासही ते ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.