महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Subodh Jaiswal : सीबीआय संचालक सुबोध जयस्वालांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस मुख्य न्यायमूर्तींचा नकार

सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल ( CBI Director Subodh Jaiswal ) यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस घेण्यास मुख्य न्यायमूर्ती यांनी नकार दिला आहे. मुंबईचे निवृत्त एसीपी राजेंद्रकुमार त्रिवेदी ( Retired ACP Rajendra Kumar Trivedi ) यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश या प्रकरणात दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे ( Bombay High Court ) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता ( Chief Justice Dipankar Dutta ) यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

Subodh Jaiswal
सुबोध जयस्वाल

By

Published : Jul 28, 2022, 4:53 PM IST

मुंबई -सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल ( CBI Director Subodh Jaiswal ) यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस घेण्यास मुख्य न्यायमूर्ती यांनी नकार दिला आहे. मुंबईचे निवृत्त एसीपी राजेंद्रकुमार त्रिवेदी ( Retired ACP Rajendra Kumar Trivedi ) यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश या प्रकरणात दिले आहेत.

हेही वाचा -Gang Rape In Nagpur District: अकरा वर्षीय मुलीवर आरोपींचा सामूहिक बलात्कार

याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे ( Bombay High Court ) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता ( Chief Justice Dipankar Dutta ) यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. याचिकाकर्ताचे वकील अॅड. सतीश तळेकर यांच्याकडून मात्र, आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. सीबीआय संचालकपदी झालेली नियुक्ती योग्य, कायदेशीरच असल्याचा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे दावा केला आहे.

हेही वाचा -Sanjay Raut : 'त्या' १२ खासदारांना अपात्र ठरवा.. संजय राऊतांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details