महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खंडणीप्रकरणी छोटा शकीलच्या हस्तक गजाआड, मुंबई पोलिसांची कारवाई - chhota shakeels aide arrested

मुंबई पोलिसांनी अंधेरीतील लोखंडवाला परिसरातून नऊ कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये कुलविंदर ऊर्फ अजय याला अटक केली. हा आरोपी एकेकाळी छोटा राजन, छोटा शकीलच्या टोळीत काम करत होता. मुंबईत स्वतःची ओळख लपवून त्याने एका बांधकाम व्यावसायिकाकडे 9 कोटींची खंडणी मागितली.

chhota shakeels aide arrested
छोटा शकीलच्या हस्तकला अटक

By

Published : Oct 13, 2020, 1:40 PM IST

मुंबई -मुंबई पोलिसांनी अंधेरीतील लोखंडवाला परिसरातून नऊ कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये कुलविंदर ऊर्फ अजय या आरोपीला अटक केली. हा आरोपी एकेकाळी छोटा राजन, छोटा शकीलच्या टोळीत काम करत होता. मुंबईत स्वतःची ओळख लपवून त्याने एका बांधकाम व्यावसायिकाकडे 9 कोटींची खंडणी मागितली. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

मुंबईतील जुहू परिसरातील एका बंगल्याच्या व्यवहारप्रकरणी कुलविंदर याने विजय ठक्कर या बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल 9 कोटींची खंडणी मागितली होती. यासंदर्भात बांधकाम व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. कुलविंदर हा सुरुवातीला छोटा राजनच्या टोळीत काम करत होता. मात्र छोटा राजनसोबत संबंध बिघडल्यानंतर त्याने छोटा शकीलसोबत काम करण्यास सुरुवात केली होती.

खंडणीविरोधी पथकाच्या म्हणण्यानुसार केनियामध्ये असताना कुलविंदर याच्यावर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीकडून गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये चार गोळ्या त्याला लागल्या होत्या. त्यानंतर तो दिल्लीमध्ये आला. 2004 साली दिल्लीतील स्पेशल सेल पोलिसांनी कुलविंदरला अटक केली होती. मात्र त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मुंबईत येऊन स्वतःची ओळख लपवून राहत होता व विविध बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details