मुंबई -डीएचएफएल प्रकरणी सीबीआयने अजय नावंदर नावाच्या व्यावसायिक आणि गँगस्टर छोटा शकीलचा हस्तकाला बुधवारी ( आज ) अटक केली आहे. नावंदर हे दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकीलचा कथित निकटवर्तीय मानले जातात. अलीकडेच सीबीआयने त्यांच्या निवासस्थानातून 36 कोटी रुपयांचे पेंटिंग जप्त केले. बँकेच्या घोटाळ्याच्या पैशातून ही चित्रशिल्प खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. सीबीआयने जून 2022 मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी छापा टाकला होता. सीबीआयने आरोपी वाधवान बांधवांच्या सातारा जिल्ह्यातील महाबाळेश्वर येथील बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. सीबीआयने गेल्या शुक्रवारी अजय नावंदर यांची डीएचएफएल प्रकरणी संदर्भात चौकशी केली होती.
Ajay Navander Arrested : डीएचएफएल प्रकरणात छोटा शकीलचा हस्तक अजय नावंदरला सीबीआयकडून अटक - छोटा शकीलच्या हस्तक अजय नावंदरला अटक
गँगस्टर छोटा शकीलचा हस्तक अजय नावंदर हे दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकीलचा कथित निकटवर्तीय मानले जातात. अलीकडेच सीबीआयने त्यांच्या निवासस्थानातून 36 कोटी रुपयांचे पेंटिंग जप्त केले. बँकेच्या घोटाळ्याच्या पैशातून ही चित्रशिल्प खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. सीबीआयने जून 2022 मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी छापा टाकला होता. याच प्रकरणी सीबीआयकडून नावंदरला अटक करण्यात आली आहे.
सीबीआयने आरोप केला आहे की, कंपनी प्रवर्तकांनी कर्जाचा निधी वळवला आणि विविध संस्थांमध्ये गुंतवणूक केली. घोटाळ्यातील काही पैसा नावंदरच्या माध्यमातून फिरवण्यात आल्याचा संशय सीबीआयला असून त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या शुक्रवारी रेबिका दीवान आणि अजय रमेश नावंदर यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. बँक घोटाळ्याचे पैसे आरोपींनी इतर लोकांनाही दिल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासात या दोघांची नावं समोर आली आहेत. रेबिका दीवान याप्रकरणातील मुख्य आरोपी कपिल वाधवान यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयनं 17 बँकांच्या समूहाला 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांतर्गत 22 जून 2022 रोजी एफआयआर दाखल केला होता आणि या प्रकरणी शुक्रवारी 8 जुलैला दिवशी तब्बल 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय? :देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. सीबीआयकडून 34 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि महाबळेश्वरमध्ये छापेमारी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचल्याचा संशय सीबीआयला आहे. कारण या छापेमारीत सीबीआयच्या हाती संशयास्पद कागदपत्रे लागली आहेत. त्यामुळे या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डची एन्ट्री झाल्याचं मानलं जात आहे. देशातला आतापर्यंत सर्वात मोठा बँक घोटाळा उघड झाला आहे. सीबीआयनं 17 बँकांच्या समूहाला 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांतर्गत 22 जून 2022 रोजी एफआयआर दाखल केला होता आणि या प्रकरणी त्याच दिवशी तब्बल 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोप आहे की सर्व नियम धाब्यावर बसवून आरोपींनी बँकेतून घेतलेली रक्कम त्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरली. त्यामुळे बँकांचं मोठे नुकसान झाले. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -Aryan Khan: मुंबई सत्र न्यायालयाचा आर्यन खानला दिलासा! पासपोर्ट मिळवण्याबाबतचा अर्ज कोर्टाकडून मंजूर