महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'छत्रपती शिवाजी महाराज' संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत’- राज्यपाल - mumbai latest news

जय जलाराम राम रोटी भंडार ट्रस्ट व नरसिंह स्वराज रक्षक फाउंडेशनच्या वतीने कांदिवली येथील महावीर नगर येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By

Published : Feb 19, 2021, 7:25 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात शिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण करताना सर्वांनी त्याग, समर्पण व एकात्म भावनेने देशासाठी कार्य केल्यास देशाचा सन्मान वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

जय जलाराम राम रोटी भंडार ट्रस्ट व नरसिंह स्वराज रक्षक फाउंडेशनच्या वतीने कांदिवली येथील महावीर नगर येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.

शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला शक्ती आणि युक्तीने नामोहरम केले-

भारतात अलेक्झांडर, औरंगजेब यांसारखे अनेक अन्यायी शासक येऊन गेले. परंतु देश सहिसलामत राहिला. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला शक्ती आणि युक्तीने नामोहरम केले. पूर्वजांचे स्मरण ठेवण्याची भारताची परंपरा असल्याचे सांगून त्याचसाठी महापुरुषांच्या जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. जे राष्ट्र आपल्या पूर्वजांना विसरते, ते राष्ट्र नष्ट होते, असे राज्यपालांनी सांगितले.

सुरूवातीला राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी कोरोना काळात सेवाभावनेने कार्य करणार्‍या कोरोना योद्ध्यांचा तसेच मेधावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

खासदार गोपाल शेट्टी, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, सुनील राणे व भाई गिरकर तसेच ट्रस्टचे अध्यक्ष धर्मानंद रतुडी महाराज व स्वराज रक्षक फाउंडेशनचे सूर्या रतुडी याप्रसंगी उपस्थित होते.

आधारिका समाज विकास संस्थेला भेट -

मातृशक्ती सर्वात मोठी शक्ती आहे. अपार कष्ट सहन करून मातृशक्ती संसाराचा गाडा चालवते. विश्वाप्रती मातृत्वभाव जागविल्यामुळेच संत ज्ञानेश्वरांना ‘माऊली‘ म्हणून संबोधले जाते. महिला विकासासाठी मुद्रा, स्टार्टअप, पंतप्रधान कौशल्य विकास आदि विविध योजना उपलब्ध आहेत. महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःची उन्नती करावी. मात्र केवळ उपजीविकेसाठी काम न करता इतर महिलांना देखील पुढे आणावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. आधारीका समाज विकास संस्थेला राज्यपालांनी भेट दिली. वाहन चालक प्रशिक्षण, ब्युटी पार्लर अभ्यासक्रम, शिलाईकाम इत्यादी प्रशिक्षण पूर्ण करून रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त केलेल्या महिलांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा-ठाकरे सरकार हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार आहे - निलेश राणे

ABOUT THE AUTHOR

...view details