मुंबईसभागृहातपालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाबाबत राखून ठेवलेल्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना माजी मंत्री छगन भुजबळ Former Minister Chhagan Bhujbal यांनी डासांच्या शवविच्छेदनाचा अहवाल Post Mortem Report of Mosquitoes आला का नेमकी काय माहिती उपलब्ध झाली, या डासांपैकी किती नर डास आणि किती मादी डास How many of Mosquitoes are Male Bhujbal आहेत. या डासांच्या शवविच्छेदनाचा अहवाल विभागाने प्राप्त केला आहे का त्यात काय माहिती आहे, असा सवाल माजी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना केला. असा मिश्किल सवाल उपस्थित केल्याने सभागृहात हास्याचे कारंजे फुटले.
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रश्नोत्तराच्या तासांत चर्चा पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रश्नांबाबत प्रश्नोत्तराच्या तासांत चर्चा सुरू होती. याबाबत उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागात या जिल्ह्यातील 38 पदे भरलेली आहेत, 31 पदे रिक्त आहेत, अशी माहिती दिली. संबंधित रुग्णांना अल्बेंडोल गोळ्या देण्यात येत आहेत. तसेच परिपत्रके छापून आणि बॅनर वाटून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती सभागृहात दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि इतर आमदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.