मुंबई -भाजपने राज्यसभा निवडणुकीत ( Rajyasabha Election 2022 ) जास्त उमेदवार दिला. मात्र, आघाडीचे उमेदवार निवडून येतील. आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही तयारी करावी लागेल, कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi Government ) उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal Press Conference In Mumbai ) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. जनता दरबारनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यसभा असो या विधानपरिषद असो यातील घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील, असेही ते म्हणाले.
पंकजांना संधी न दिल्याचा परिणाम होईल -पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचले होते. दिलेल्या संधीचं सोनं करेन परंतू त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. संधी द्यायला हवी होती. खडसेंच्या बाबतीत तेच झाले होते. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो, असे सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केले.