महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस, राष्ट्रवादीला फटका बसणार नाही' - चंद्रकांत हंडोरे

आपण केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस - राष्ट्रवादीला फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत हंडोरे यांनी दिली आहे.

चंद्रकांत हंडोरे

By

Published : Oct 2, 2019, 11:46 PM IST

मुंबई- महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसने चेंबूर येथून प्रचाराला सुरुवात केली..काँग्रेस पक्षाने माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना चेंबूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर विद्यमान शिवसेनेचे आमदार प्रकाश फातरपेकर यांचे आव्हान आहे. तसेच आम्हाला वंचितचा फटका बसणार नसल्याचे हंडोरे यांनी सांगितले.

चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस उमेदवार, चेंबूर

हेही वाचा - गांधी @150 : रामोजी राव यांच्या हस्ते बापूंच्या प्रिय भजनाचे लोकार्पण

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या नालदा सभागृहात काँग्रेसची पहिली प्रचार सभा पार पडली. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी युती नसल्याने चंद्रकांत हंडोरे यांचा निसटता पराभव झाला होता. यावेळी देखील वंचित बहुजन आघाडी त्यांची मते कमी करू शकते. या बाबत बोलताना हंडोरे यांनी आपण केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस - राष्ट्रवादीला फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - पाठित खंजीर खुपसला तरी पक्षनिष्ठा कायम, मेधा कुलकर्णी झाल्या भावनिक

ABOUT THE AUTHOR

...view details