मुंबई - केंद्र सरकारने अनलॉक-3 दरम्यान राज्य सरकारांकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता व्यक्ती, माल वाहतूक आणि इतर सेवांना परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्यात आता गणेशोत्सवाचा काळ संपताच ई-पास आणि इतर निर्बंधांसंदर्भात नव्याने विचार केला जाणार आहे. त्यासाठीचे संकेत मुख्य सचिव संजयकुमार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले. ई-पास संदर्भातही सूट दिली जाणार असून त्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर ई-पास रद्द होण्याची शक्यता, मुख्य सचिवांनी दिले संकेत
केंद्र सरकारने नुकतेच कोणत्याही निर्बंधाविना नागरिक, माल वाहतूक आणि सेवांच्या वर्दळीला परवानगी देण्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्यांना निर्देश आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी सांगितले की, केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी आम्ही राज्यातील कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेत आहोत, अशी माहिती मुख्य सचिव संजयकुमार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
केंद्र सरकारने नुकतेच कोणत्याही निर्बंधाविना नागरिक, मालवाहतूक आणि सेवांच्या वर्दळीला परवानगी देण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना निर्देश आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी सांगितले की, केंद्र सरकारने दिेलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी आम्ही राज्यातील कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेत आहोत. त्यासाठी विभागीय स्तरावरील माहिती घेतली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना काही देण्यात आलेले अधिकार आणि त्यांचा विचारही महत्त्वाचा आहे. यामुळे या सर्व बाबींचा विचार करून त्यासाठी कायदेशीर बाबी काय आहेत, याचा विचार करून निर्णय घेणार आहोत. यात नागरिकांची सोय करत असताना त्यांची काळजीही तितकीच महत्त्वाची आहे, याचाही विचार केला जाणार असल्याचे सचिवांनी सांगितले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक-3 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली होती. त्याच पार्श्वभूमीवर व्यक्ती आणि मालाच्या आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वर्दळीवर कोणतेही निर्बंध असू नयेत, असे या आदेशात नमूद केल्याचे पत्रकात सांगितले आहे. त्यामुळे राज्यात गणेशोत्सवानंतर ई-पास आदींसाठी महत्त्वाचे निर्णय सरकारकडून घेतले जाण्याची शक्यता आहे.