हैदराबाद- देशात सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. सर्व जाती-धर्माचे लोकं या उत्सवात गरबा खेळतात. मात्र हैदराबादच्या बजरंग दल दांडिया उत्सव मंडळाने एक अजब फतवा काढलेला आहे. गैर-हिंदूंना ओळखण्यासाठी गरबा खेळायला येताना आधार कार्ड सोबत घेवून यावे, असे या संघटनेने म्हटले आहे.
अजब फतवा : नवरात्र उत्सवात आधार कार्ड सोबत घेवून या; बजरंग दलाचा जातीय 'गरबा' - BAJARANG DAL
धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही संघटनांकडून अनेक निर्णय घेतले जातात. हैदराबादमध्ये नवरात्र उत्सवात बजरंग दलाकडून असाच एक निर्णय घेण्यात आला आहे.

बजरंग दलातील सभासद
नवरात्र उत्सवाला जातीय रंग देण्याचे काम बजरंग दल करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. बजरंग दलाकडून आयोजित गरबा कार्यक्रमात फक्त हिंदुनाच प्रवेश मिळणार आहे. बजरंग दलाला या कार्यक्रमात हिंदु व्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील लोकांना स्थान नाही. त्यामुळे बजरंग दलावर टीका होत आहे.