जागतिक महिला दिनानिमित्त सीएसएमटी इमारतीला विद्युत रोषणाई
जागतिक महिला दिनी आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीला देखील दरवर्षी 8 मार्च निमित्त आकर्षक रोषणाई केली जाते.
मुंबई - जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ऐतिहासिक वास्तू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईच्या माध्यमातून रेल्वेकडून समस्त महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीला देखील दरवर्षी 8 मार्च निमित्त आकर्षक रोषणाई केली जाते.