मुंबई - अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी आज बोरिवली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी ८५ पानी आरोपपत्रात २३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम ३५३ आणि ३४ अंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Chargesheet filed against Rana Couple : राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांकडून आरोपपत्रात २३ जणांचे जबाब - खार पोलिसांकडून राणा दाम्पत्याविरोधात आरोपपत्र
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी आज बोरिवली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी ८५ पानी आरोपपत्रात २३ जणांचे जबाब नोंदवले आहेत.
राणांच्या वकिलांची प्रतिक्रिया - नवनीत आणि रवी राणा यांच्यावतीने वकील धर्मेंद्र कुबेर यांनी न्यायालयात हजर राहिले. प्रसारमाध्यमाशी बोलताना राणांच्या वकिलांनी माहिती दिली की, आज पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने आज दोघांनाही न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट दिली आहे. पुढील सुनावणीची तारीख १६ जून निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणासंदर्भातली सुनावणी सत्र न्यायालयात सुरू असल्याने, तर हे प्रकरणही तिकडे सत्र न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग केले जाईल.
काय आहे प्रकरण - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्याच्यावतीने हनुमान चालीसा वाचण्यात येणार होती. या वादाप्रकरणी कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर दोघांचा पोलिसांशी वाद झाला, त्यानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत आयपीसीच्या कलम 353 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.