महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Avinash Bhosale : अविनाश भोसलेंनी कर्जाच्या पैशातून लंडनमध्ये संपत्ती घेतली; सीबीआयचा दावा

डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील आरोपी पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले ( Chargesheet Filed By CBI Against Avinash Bhosale ) होते.

By

Published : Jul 29, 2022, 5:45 PM IST

Avinash Bhosale
Avinash Bhosale

मुंबई - डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील आरोपी पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्याविरोधात सीबीआयने सोमवारी (दि.25) रोजी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात सांगितल्यानुसार, अविनाश भोसलेंनी वेगवेगळ्या माध्यमातून मिळवलेली 300 कोटींचा रक्कम लंडनमध्ये संपत्ती विकत घेण्यासाठी वापरली आहे, असे सीबीआयने ( Chargesheet Filed By CBI Against Avinash Bhosale ) सांगितलं.

अविनाश भोसले यांना 26 मे रोजी सीबीआयने पुण्यातून अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अविनाश भोसलेंनी 2018 मध्ये येस बँकेचे राणा कपूर यांच्या माध्यमातून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. या पैशातून भोसलेंनी लंडनमध्ये फाइव्ह स्ट्रॅण्ड येथे संपत्ती विकत घेतली. या संपत्तीची किंमत जवळपास 1 हजार कोटी इतकी आहे. दरम्यान, भोसलेंच्या मालकीच्या कंपनीला 68 कोटी 82 लाख रुपये सल्लागार फी 183 कोटी रुपये डीएचएफएलकडून कर्ज म्हणून मिळाले. तर, रेडियस समुहाकडून कंपनीने 317 कोटी 40 लाख रुपये घेतल्याचे आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवानसोबत डीएचएफएलला आर्थिक साहाय्य केले आहे. येस बँकेने एप्रिल ते जून 2018 या काळात डीएचएफएलमध्ये अल्पमुदतीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये 3983 कोटी गुंतवले होते. तसेच, येस बँकेने डीएचएफएलची समूह कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला वांद्रे येथील प्रकल्पासाठी 750 कोटींचे आणखी कर्ज मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

कपिल वाधवानने डीएचएफएलच्या माध्यमातून राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येस बँकेकडून कर्जाच्या नावाखाली 600 कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. तर, भोसले यांना तीन प्रकल्पांसाठी 2018 मध्ये 68 कोटी रुपये मिळवून दिले. त्यातील अ‍ॅव्हेन्यू 54 आणि वन महालक्ष्मी हे दोन प्रकल्प बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियांनी डेव्हलप केले आहेत. भोसलेंना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला शुल्क रक्कम मिळाली होती. प्रकल्पाचा खर्च वास्तुविशारद आणि अभियांत्रिकी आराखडा करार वित्तीय मूल्यांकन व संरचना आदींबाबत भोसलेंच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

नेमकं प्रकरण काय -पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल गुरुवारी ( 28 जुलै ) रात्री सीबीआयकडून अटक करण्यात आली. डीएचएफएल प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे.

हेही वाचा -Akshay Vallaal Murder Case: पुण्यातील हत्या प्रकरण! कोण होता अक्षय वल्लाळ? वाचा सविस्तर ईटीव्ही भारतचा आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details