महाराष्ट्र

maharashtra

बदलते राजकारण.. नाना पटोले यांच्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी कोण ?, महाविकास आघाडीतही संभ्रम

By

Published : Feb 5, 2021, 5:05 PM IST

Updated : Feb 5, 2021, 5:25 PM IST

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारण बदलत असून महाविकास आघाडीतही संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याने पुन्हा आघाडीला या राजकीय राजकीय पेचाला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना या सत्ताधारी घटक पक्षातही काहीशी नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.

Nana Patole
Nana Patole

मुंबई -नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारण बदलत असून महाविकास आघाडीतही संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याला कारणही तसेच आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याचे अध्यक्षपद महाआघाडीत ठरल्याप्रमाणे काँग्रेसच्या वाट्याला आले, मात्र आता पुन्हा अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळेल, अशी स्पष्ट भूमिका अद्याप महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केलेले नाही. त्यामुळे पुढचे विधानसभा अध्यक्ष कोण? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

पटोले यांचा राजीनामा, प्रदेशाध्यक्ष तसेच मंत्रीपदाचीही चर्चा जोरात -

काँग्रेसने पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला असून प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील आक्रमक नेते नाना पटोले याना देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या आदेशानेच मी राजीनामा दिला असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केले. पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा काँग्रेसने केली आहे. त्याचबरोबर पटोले यांना मंत्रिपद देऊन काँग्रेसचा आक्रमक चेहरा सभागृहात आणण्याची तयारी सुरु असल्याचीही जोरदार चर्चा आहे. यावर बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले की, पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले आहे. मात्र, त्यांना मंत्री करायचे किंवा नाही यावर पक्षश्रेष्टी योग्य तो निर्णय घेतील. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडीत चर्चा होईल.

विधानसभा अध्यक्षपदासाठी पाडवी व पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची चर्चा -
काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री आणि जेष्ठ नेते के. सी. पाडवी यांचीही वर्णी लागू शकते, अशी काँग्रेसच्या गोटात चर्चा सुरु आहे. पाडवी यांच्या निमित्ताने आदिवासी समाजाला प्राधान्य देण्याचा प्रयत्नही एकीकडे सुरू आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात महाविकास आघाडीत संभ्रम -
महाविकास आघाडी सरकरने नुकताच आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. राजकीय संघर्षातही आघाडी उदयाला आली असून आघाडीने आपले बहुमत सभागृहात सिद्ध केले आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडत असताना किमान सामान कार्यक्रमावर कारभार सुरु असल्याचे आघाडीतील नेते वारंवार सांगत आहेत. याच स्थितीत अध्यक्ष निवडीच्या मुद्दयावर पुन्हा सरकारला आपले संख्याबळ दाखवावे लागणार आहे.
नाना पटोलेंचा राजकीय प्रवास

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याने पुन्हा आघाडीला या राजकीय राजकीय पेचाला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना या सत्ताधारी घटक पक्षातही काहीशी नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. आघाडीचे मार्गदर्शक व जेष्ठ नेते शरद पवार यांनीही या मुद्यावर भाष्य केले असून विधानसभा अध्यक्ष पदाबाबत सर्व घटक पक्षांशी चर्चा झाल्यानंतरच याबाबतची घोषणा करण्यात येईल, अशी भूमिका मांडली आहे. मात्र काँग्रेसलाच अध्यक्षपद मिळेल असे थेट वक्तव्य पवार यांनी केले नसल्याने आघाडीतही संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्षपदावरून संभ्रम निर्माण झालेला असतानाच विधान परिषदेच्या अध्यक्षपदावरही चर्चा व्हावी, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Last Updated : Feb 5, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details