मुंबई- कॉ गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडून करण्यात येणारा तपास हा योग्य दिशेने सुरू नसून न्यायालयाकडून यापूर्वही बऱ्याच वेळा तपासयंत्रणेच्या तपासावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - निवडणुकीतले 'बाप'माणूस; मुलांसाठी करतायेत जीवाचं रान
पानसरे कुटुंबीयांकडून न्यायालयात तपास अधिकारी बदलण्याची तोंडी मागणी केली असता, उच्च न्यायालयाने पानसरे कुटुंबीयांना लेखी स्वरूपात या संदर्भात याचिका दाखल करण्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - निवडणुकीतले 'बाप'माणूस; मुलांसाठी करतायेत जीवाचं रान
दरम्यान, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मुबंई उच्च न्यायालयात या आगोदरच अहवाल बंद लिफाफ्यात सादर करण्यात आला होता. त्यावेळेस मुबंई उच्च न्यायालयाने पुन्हा नाराजी व्यक्त करत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका, असे म्हणत तपास करणाऱ्या एसआयटीला चांगलेच खडसावले होते. तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर पुरावे उघड करणे हे आम्हाला पसंत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हणत या प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयचा अती उत्साहीपणामुळे केसची हानी होईल, असेही आज न्यायालयाने नमूद केले आहे.