महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रधान सल्लागारानेच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली; नाना पटोलेंना मानसिक उपचारांची गरज - चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्याबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Former Chief Secretary Sitaram Kunte) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. सीताराम कुंटे हे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. म्हणून त्यांचा खुलासा अधिक गंभीर ठरतो, असं रोखठोक मत भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी व्यक्त केलंय. शिवाय नाना पटोले यांच्यावर मानसिक उपचाराची गरज असल्याचा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

By

Published : Jan 30, 2022, 5:36 PM IST

Updated : Jan 30, 2022, 6:35 PM IST

नागपूर -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्याबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Former Chief Secretary Sitaram Kunte) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. सीताराम कुंटे हे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. म्हणून त्यांचा खुलासा अधिक गंभीर ठरतो, असं रोखठोक भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी व्यक्त केलंय.

सीताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार आहेत, त्यांनी ईडी समोर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेबद्दल जे मत व्यक्त केले आहे, ते गंभीर आहे.. खरे पाहिले तर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. मात्र सीताराम कुंटे यांनी त्या वेळेस तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आयपीएस यांच्या बदल्या संदर्भात कोणाला कुठे पोस्टिंग द्यायची आहे, याची नावासकट यादी पाठवत होते असे ईडी समक्ष सांगितले आहे. हे अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांना कोणाचा आशीर्वाद होता हे समोर आलं पाहिजे.

चंद्रशेखर बावनकुळे

नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत -

नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत. यापूर्वीही राज्यात वध आणि हत्या या मुद्द्यावर मोठा गदारोळ झाला. त्यांनी असे वक्तव्य करू नये. मी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार आहे. त्यांनी असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि रोज काँग्रेसची प्रतिमा मलिन करणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी ठेवू नये, अशी विनंती त्या पत्रातून करणार आहे.

युतीचे सरकार असताना महाराष्ट्राच्या अनेक लोकप्रतिनिधींनी, त्यामध्ये शिवसेनेचे ही अनेक लोकप्रतिनिधी होते, ज्यांनी घरपोच मद्यविक्री सुरू करावी त्यासाठी एक्साईज आकारावा अशी मागणी केली होती. मात्र, जेव्हा तो प्रस्ताव आमच्या समोर आला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मिनिटात तो प्रस्ताव फेटाळून लावला होता.

संजय राऊत यांनी अभ्यास करावा -

परवा संजय राऊत म्हणाले की मागच्या सरकारच्या वेळेला असा प्रस्ताव आला होता. मात्र मागचे सरकार भाजप-सेनेचे नव्हते का? तेव्हा संजय राऊत सेनेत नव्हते का? संजय राऊत यांनी अभ्यास केला पाहिजे की, मागच्या सरकारमध्ये तसा प्रस्ताव कोणी आणला होता. तसा प्रस्ताव देणारे कोणते लोकप्रतिनिधी होते आणि फडणवीस यांनी तो प्रस्ताव किती कालावधीत रद्द केला.

संजय राऊत या सरकारने किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय घेऊन जे पाप केले आहे ते पाप लपवण्यासाठी तुम्ही मागच्या युती सरकारवर आरोप करत आहात. संजय राऊत सध्या बावचलेले आहेत, त्यांना काय बोलावं कसं बोलावं याचे भान राहिलेले नाही.

कोणत्या लोकप्रतिनिधींनी तेव्हा घरपोच विक्री परवानगी संदर्भात प्रस्ताव दिला होता. त्यांचे नाव आता सांगता येणार नाही. मात्र असा अनेक लोकप्रतिनिधींचा प्रस्ताव होता मात्र आम्ही फेटाळला होता. वायनरीमध्ये कोण-कोण व्यवसायिक आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. विंचूरपर्यंत कोण वायनरी मालक आहेत. त्यांची वाइन कुठे जाते हे सर्वांना माहीत आहे. यांचे 20-20, 30-30 वर्षांपासून संबंध आहेत.

भष्टचाराला वाव असणारा निर्णय तात्काळ होतो -

महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या निर्णय भ्रष्टाचाराला वाव आहे. तो निर्णय त्वरित होतो... किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय ही अशाच भ्रष्टाचार करण्यासाठी हा निर्णय झालाय... किराणा दुकानातून वाईन विक्रीचा प्रस्ताव आमच्या सरकारच्या काळात ही आला होता. मात्र आम्ही तेव्हा तो फेटाळला होता. अजित पवार म्हणतात वाईन आणि लिकरमध्ये फरक आहे. मात्र त्यांना हे ज्ञान कुठून मिळाले हे त्यांनी सांगावे. ते असे बेजबाबदार वक्तव्य कसे काय करू शकतात, असा सवालही बावनकुळे यांनी केला आहे.

वाईनचा निर्णय कुणासाठी घेतला लवकरच उघड करू -
वाईन म्हणजे दारू नाही, याची माहिती अजित पवारांनाच माहीत. पण त्यांना हे बोलणे शोभत नाही. बेजबाबदार वक्तव्य पवारांनी करू नये. शेतकर्‍यांच्या नावाखाली कुण्या एकाला फायदा पोचवण्यासाठी हा निर्णय घेतला हे आम्ही नंतर स्पष्ट करून पण सध्या तर शेतकर्‍यांची व जनतेची दिशाभूल केली जात असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

Last Updated : Jan 30, 2022, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details