मुंबई : भारतीय जनता पक्षाने मुंबईत ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाबाबत काढलेला मोर्चादरम्यान अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे त्यांना "घरी जा, स्वयंपाक करा" असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत आता महिला आयोगाकडे पत्र देऊन चंद्रकांत पाटील दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत. आपल्या पक्षाने विधानसभेत बारा आमदार तर लोकसभेत पाच महिला खासदार निवडून दिले आहेत.
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, या त्रागाने आंदोलनादरम्यान ग्रामीण वाक्यप्रचार वापरला होता. मात्र, त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे किंवा इतर महिलांना अपमानित व्हावे लागले. यासाठी आम्हाला दुःख आहे, असे पत्र चंद्रकांत पाटील यांनी महिला आयोगाला दिले आहे.