मुंबई -शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. शिवसेनेचा एक गट नाराज असल्याने ते शिवसेनेपासून दूर गेले आहेत. मात्र, सध्या आम्ही यावर कुठलेही भाष्य करू इच्छित नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर आम्ही आमचे मत व्यक्त करू. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा हा अंतर्गत विषय असल्याने आम्ही आता अधिक बोलू शकत नाही. मात्र, अद्याप सरकार सादर करण्याची कुठलीही तयारी भाजपकडून नसल्याचे देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे.
मविआचे अनेक आमदार नाराज - शिवसेनेच्या नेतृत्वाचे एक स्किल आहे. सहकाऱ्यांना शब्द द्यायचा आणि खोटा विश्वास निर्माण करायचा हेच काम अडीच वर्ष शिवसेनेच्या नेतृत्वाने केले आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबरच मविआमधील अनेक आमदार नाराज आहेत. मविआ सरकार ही फक्त सेटलमेंट होती. यामुळेच काही नेते आपण कधी यातून बाहेर पडणार असा प्रश्न विचारत होते. त्यामुळेच पक्षात फूट पडत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या राजकीय नाट्यावर समजनेवालों को इशारा ही काफी है, असे स्पष्ट करत पुढे काय हाेईल हे माहित नाही. सध्या तरी वेट अँड वाॅच अशी आमची भूमिका आहे, असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
जे होतं ते चांगल्यासाठीच -भाजपने विधान परिषद विजयानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. भाजपला सहकार्य करणाऱ्या सर्व नेते कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. या निवडणुकीत अपक्षांचा भाव वाढला. भाजपला स्वत:ची ताकद मिळाली आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होते असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना अडचणित - मविआच्या नाराज आमदारांची आम्हाला मदत झाली. शिंदेंनी भाजपला प्रस्ताव दिलेला नाही. अद्याप आमचा एकनाथ शिंदेशी कोणताही संपर्क किंवा चर्चा झाली नाही. पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. सध्या तरी वेट अँड वाॅच असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंकडून प्रस्ताव आल्यास भाजप स्वीकारेल असा दावाही पाटील यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. लोक सहन करू शकत नाहीत हे एकनाथ शिंदेंच्या बंडातून दिसून आलं आहे. त्यांनी प्रत्येक मुद्दावर कठोरपणे बोलण्याची गरज नाही अशा शब्दांत पाटील यांनी राऊत हेच या बंडाला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -Jyotiraditya Scindia: महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर सिंधिया म्हणाले, सरकार संभाळने होत नसेल तर बाजूला व्हा