मुंबई - युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. युती लवकरच घोषित होईल. ज्यांनी युती होऊनये यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. असे चंद्रकांत पाटील मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात.. लवकरच होईल घोषणा - चंद्रकांत पाटील - Maharashtra Assembly Election News
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा सुरू आहे, निर्णय लवकरच होइल असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्याशी फोनवर बोलून योग्य रीतीने युतीबाबत चर्चा चालू आहे. मी यावर बोलणे योग्य होणार नाही. युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेची भविष्यवाणी मला करता येणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी त्यांनी २२० जागा निवडुन येतील असा विश्वास व्यक्त केला. आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत. अध्यक्ष हे माझे स्थान आहे. हे काँग्रेसमध्ये चालते. आमचा पक्ष आपल्या सहयोगी पक्षाशी चर्चा करूनच निर्णय घेतो असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना पाटील म्हणाले ते चांगले लेखक आहेत, ते अनेक उदाहरणातून आपली गोष्ट ठेवत असतात.
भाजप ५ बुथचा एक शक्ती केंद्र उभारणा आहे. त्यातून हजारो मतदार जोडले जाणार आहे. या बुथ संदर्भात उद्यापासून संमेलन सुरू होणार आहे. असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी महाजनादेश यात्रा यशस्वी झाल्याचे सांगितले.