महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil on Sanjay Raut : संजय राऊतांच्या डोक्यातील मी काय सांगू? - संजय राऊत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की संजय राऊत काय बोलतील हे त्यांनाच माहीत आहे ते काय बोलताय त्यावर मी दिल्लीत प्रतिक्रिया देईल. राऊत यांच्या डोक्यात आणि मनात काय आहे मी कसं सांगू. त्यांना बोलू द्या मगच मी बोलतो असं देखील यावेळी पाटील म्हणाले.

Chandrakant Patil
Chandrakant Patil

By

Published : Feb 15, 2022, 12:28 PM IST

पुणे- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान देत शड्डू ठोकला आहे. पुढच्या काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशाराही त्यांनी काल दिला आहे. त्यानंतर आज शिवसेना भवनात संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेत राऊत कोणते नवे खुलासे करणार? भाजपाचे साडेतीन लोक कोण? त्यांच्याबद्दल संजय राऊत काय बोलणार? या सगळ्याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की संजय राऊत काय बोलतील हे त्यांनाच माहीत आहे ते काय बोलताय त्यावर मी दिल्लीत प्रतिक्रिया देईल. राऊत यांच्या डोक्यात आणि मनात काय आहे मी कसं सांगू. त्यांना बोलू द्या मगच मी बोलतो असं देखील यावेळी पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details