मुंबई -गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही या आंदोलनावर राज्य सरकार तोडगा काढू शकलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन असेच सुरू राहिल्यास त्याचा परिणाम एसटी कर्मचाऱ्यांच्या 1 लाख कुटुंबावर होईल. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे ग्रामीण भागात जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर उपाय काढणे गरजेचे असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले ( Chandrakant Patil On Govt Proposal ) आहेत. तसेच कर्मचारी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आग्रही असले तरी, राज्य सरकारने पगारवाढीचा योग्य तो प्रस्ताव नेल्यास कर्मचारी दोन पावले मागे येऊन पर्याय निघेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil About ST Employees Agitation ) व्यक्त केला.
शिवसेनेला सर्व सोडायला लागेल -