मुंबई - शिवसेनेने जनमताचा अनादर केला असून, बहुमत असतानाही सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संपर्कात राहिले. तसेच त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशआध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवर घोडेबाजारीचा आरोप केला होता. यावर बोलताना, अरे राऊत.. आता तरी शांत बस बाबा! अशी टीका त्यांनी केली आहे.
अरे..राऊत आता तरी शांत बस बाबा...चंद्रकांत पाटलांचा सेनेवर 'बाण' - चंद्रकांत पाटील बातम्या
सकाळपासून राज्यभरात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना प्रत्येक क्षणी वेगळे वळण लागत असल्याचे चित्र आहे. यातच मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावरुन बैठकीतून परतताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

अरे..राऊत आता तरी शांत बस बाबा...चंद्रकांत पाटलांचा सेनेवर 'बाण'
शिवसेनेने कायमच आमचा आपमान केल्याचं त्यांनी म्हटलयं. तसेच पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा राऊत यांच्या तोंडात शोभत नसून त्यांनीच आमच्या पाठीत खुपसला आहे, असे पाटील म्हणाले.
शिवसेनेने कधीच बैठकींमध्ये सहकार्य केले नसून, सुरुवाती पासूनच मुख्यमंत्रीपदाचा अट्टाहास धरल्याने सकारात्मक चर्चेला वाव न राहिल्याचे त्यांनी सांगितले.
Last Updated : Nov 23, 2019, 3:41 PM IST