मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दीड ते दोन महिन्यात होण्याची शक्यता ( Mumbai Municipal Election )आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी बाबत लवकरच बैठक पार पडणार ( Chances are low of Mahavikas Aghadi in Mumbai Municipal Election ) आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
तिन्ही पक्षाचा पाठबळ मिळणार :अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असून यामध्ये उद्धव ठाकरे गटांचे उमेदवार ऋतुजा लटके यांना तिन्ही पक्षाचा पाठबळ मिळणार आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात (Congress leader Meet Uddhav Thackeray on Matoshree ) आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतेमंडळींनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत पाठिंबा दर्शवला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी झाली असली तरी, होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय? अद्यापही महाविकास आघाडी कडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. खास करून मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी होणार का ? हा प्रश्न देखील अद्याप अनुत्तरीत आहे.
आघाडीची शक्यता कमी :मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील दीड ते दोन महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे. अवघ्या देशभराचे लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर आहे. गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला यावेळीही आपली सत्ता मुंबई महानगरपालिकेवर टिकवण्याचं आवाहन असेल. तर दुसरीकडे पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे रणनीती आखली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते मुंबई महानगरपालिकेसाठी अनेक बैठका घेत आहेत. त्यातच शिवसेनेमध्ये पडलेली उभ्या फुटीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या यंदा होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागले आहेत.
राजकीय वर्तुळातील कयास :त्यामुळेच यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र मिळून निवडणूक लढवतील असे कयास राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. कारण दोन्हीही पक्ष हे मुंबईत प्राबल्य असलेले पक्ष आहेत. त्यामुळे 227 नगरसेवक जागा असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाचा तिढा या दोन्ही पक्षासमोर असणार आहे. वर्षानुवर्ष शिवसेना आणि काँग्रेस विरोधात लढत आले असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा मुंबई महानगरपालिकेत सुटणं कठीण असल्याचं मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो व्यक्त करतात.