मुंबई - अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Area) निर्माण झाला आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने आज (शुक्रवार) मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
- १९ जिल्ह्यांना येलो अलर्ट -
हवामान खात्याकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
- 'या' पाच राज्यात पाऊस -