मुंबईमुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांनी 2 चेन स्नॅचर्सना फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध एक दोन नव्हे, तर २० हून अधिक चेन स्नॅचिंगचे गुन्हे मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. Mumbai Crime अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फिरोज नसीर शेख आणि युसूफ जाफरी उर्फ जाफर चौव्हाण अशी आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक दुचाकी आणि सोनसाखळी जप्त केली आहे.
100 हून अधिक सीसीटीव्ही तपासलेमुंबई पोलीस झोन १२ पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 चेन स्नॅचिंग आणि बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.