महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लस न घेताच मिळाले लसीकरणाचे प्रमाणपत्र, लसीकरण केंद्रातील सावळा गोंधळ

कोरोनापासून बचावासाठी सध्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. महानगर पालिकेकडून लसीकरण केंद्र देखील उभारण्यात आले आहेत. मात्र लसीकरण केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाटकोपर राजावाडी लसीकरण केंद्रात नाईक दाम्पत्य गेले होते, मात्र नोंदणी करण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्याला लसीकरण न करताच दुसऱ्या डोसचेही लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले असून, या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाला आहे.

लस न घेताच मिळाले लसीकरणाचे प्रमाणपत्र
लस न घेताच मिळाले लसीकरणाचे प्रमाणपत्र

By

Published : Apr 16, 2021, 8:31 PM IST

मुंबई -कोरोनापासून बचावासाठी सध्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. महानगर पालिकेकडून लसीकरण केंद्र देखील उभारण्यात आले आहेत. मात्र लसीकरण केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाटकोपर राजावाडी लसीकरण केंद्रात नाईक दाम्पत्य गेले होते, मात्र नोंदणी करण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्याला लसीकरण न करताच दुसऱ्या डोसचेही लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले असून, या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान यावर तांत्रिक चुकीमुळे ही गडबड झाल्याचे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

लस न घेताच मिळाले लसीकरणाचे प्रमाणपत्र

एकीकडे लसीकरण करा म्हणून सरकार लोकांना आवाहन करतं आहे. मात्र, दुसरीकडे लसीकरण करताना सावळा गोंधळ समोर आला आहे. कारण, लस न घेताच लस घेतल्याचं प्रराणपत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाटकोपरमधल्या नाईक दाम्पत्याने लसीचा पहिला डोस घेतला, मात्र दुसरा डोस घेण्याआधीच त्यांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले म्हणून अभिनंदनाचा मेसेज आला आणि थेट अधिकृत प्रमाणपत्रही मिळालं.

'तांत्रिक चुकीमुळे गडबड'

दरम्यान हे प्रकरण समजून घेण्यासाठी महापूर किशोरी पेडणेकर यांनी राजावाडी रुग्णालयात धाव घेतली, यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, राजावाडी लसीकरण केंद्रामध्ये नाईक दाम्पत्याला पहिला डोस मार्चमध्ये देण्यात आला होता. दुसऱ्या डोससाठी ते आले होते. तेव्हा त्यांना माहिती देण्यात आली की तुमचा दुसरा डोस झालेला आहे, त्याचे प्रमाणपत्र देखील आलेले आहे. मात्र नाईक दाम्पत्याने लस घेतलीच नव्हती. संगणकामध्ये त्यांचा डोस पूर्ण झाल्याचे दिसत होते. मात्र डायरी तपासली असता त्यामध्ये त्याची नोंद नव्हती. टेक्निकल चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

'कुणाच्याही कोंबड्याने उजाडू दे'

दरम्यान १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी, या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिली, याबद्दल मी आपले आभार मानतो. असे टिट्व राज ठाकरे यांनी पत्रतप्रधानांना उद्देशून केले होते. यावर प्रतिक्रिया देताना महापौर म्हणाल्या की, कुणाच्याही कोंबड्याने उजाडू दे, राज ठाकरे पाहत आहेत, त्यांनाही काळजी आहे, ज्यांनी सकारात्मक काम केले त्या सगळ्यांचे आभार मानते.

हेही वाचा -राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार, म्हणाले- एकत्रित संकटावर मात करता येईल

ABOUT THE AUTHOR

...view details