मुंबई - मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मुंबईमधील ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी गेल्या दीड वर्षात मुंबई महानगरपालिकेने लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पार केले आहे. मात्र ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. ( Corona vaccine ) यामुळे येत्या ७५ दिवसात मुंबईमधील ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांनी बूस्टर डोस देण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. यावर केंद्र सरकारची गाईडलाईन आल्यावर बूस्टर डोस दिले जातील असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईत असे झालेय लसीकरण -मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरु झालाय आहे. ( Provide Free Dose Of Corona Vaccine ) या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ८ लाख ३० हजार ८६५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला, ९७ लाख २४ हजार ७०५ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही तर ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत. १२ ते १४ वयोगटातील १ लाख ५८ हजार ३७४ मुलांना पहिला तर ८२ हजार ४९४ मुलांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. १५ ते १७ वयोगटातील ३ लाख ९५ हजार ३०२ मुलांना लसीचा पहिला तर २ लाख ९७ हजार ३२६ मुलांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
पालिका उद्दिष्ठापासून लांबच - मुंबई महानगरात १८ वर्षांवरील नागरिकांचा विचार करता, एकूण ९२ लाख ३६ हजार ५०० मुंबईकरांना दोन्ही लसी देवून लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. इतक्याच मुंबईकरांना बूस्टर डोस द्यावा लागणार आहे. महापालिकेने आतापर्यंत ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. मुंबईमधील ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांनी अद्याप बूस्टर डोस घेतलेला नाही. बूस्टर डोस वयोवृद्ध, हेल्थ वर्कर आणि फ्रंट लाईन यांनाच मोफत दिला जात होता. इतरांना बूस्टर डोस विकत घ्यावा लागत होता. आता केंद्र सरकारने ७५ दिवस बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे उर्वरित ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे आवाहन पालिकेसमोर आहे.