मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासावेळी प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक प्रवासी विना मास्क प्रवास करत असल्याने विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. १७ एप्रिल २०२१ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान मास्क न घातलेल्या ( Passengers who Not Wear Mask ) ३४ हजार ७२४ प्रवाशांवर रेल्वेने कारवाई केली असून त्यांच्याकडून ५७ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केला ( Central Railway Recover fine ) आहे.
Central Railway Recover fine : ३४ हजारपेक्षा जास्त विना मास्क रेल्वे प्रवाशांवर कारवाई, ५७लाख ३६ हजारांचा दंड वसूल - विना मास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई
मध्य रेल्वेने रेल्वे प्रवासावेळी मास्क परिधान न करणाऱ्या प्रवाशांवर दंडत्मक कारवाई ( Central Railway Recover fine ) केली आहे. १७ एप्रिल २०२१ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान मास्क न घातलेल्या ( Passengers who Not Wear Mask ) ३४ हजार ७२४ प्रवाशांवर रेल्वेने कारवाई केली असून त्यांच्याकडून ५७ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केला आहे.
नव्या वर्षाचा जोरदार कारवाई -काेराेनाचे संक्रमण राेखण्यासाठी प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. तरीही प्रवासी मास्क घालत नाहीत. बरेच प्रवासी आपले मास्क नाकावर न घालता, हवुनटीवर ठेवतात. तर काही जण मास्कच वापरत नाहीत. त्यामुळे ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर मास्क परिधान न करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वेतर्फे कारवाई केली जाते. मध्य रेल्वेने वर्षाच्या सुरुवातीपासूनच विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर कडक करावाई करण्यास सुरुवात केली आहे.१ ते १९ जानेवारी दरम्यान सहा हजार ६४१ विना मास्क प्रवाशांकडून ११ लाख ९ हजारांचा दंड वसुल केला आहे. १७ जानेवारी राेजी मध्य रेल्वेवर सर्वाधिक ७०६ विना मास्क प्रवाशांवर कारवाई केली आहे. १७ एप्रिल २०२१ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान मास्क न घातलेल्या ३४ हजार ७२४ प्रवाशांना पकडले आहे.त्यांच्याकडून ५७लाख ३६ हजारांचा दंड आकारला आहे.
अशी आहे कारवाईची आकडेवारी -गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ३ हजार ९५२ विना मास्क प्रवाशांकडून ७लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर भुसावळ विभागातून १५ हजार ४१ विना मास्क प्रवाशांकडून १७ लाख ४८ हजार रुपये, नागपूर विभागातून ८ हजार ९२७ विना मास्क प्रवाशांकडून १७ लाख ८४ हजार रुपये, सोलापूर विभागातून २ हजार ९९३ विना मास्क प्रवाशांकडून ६ लाख ८ हजार रुपये आणि पुणे विभागातून ३ हजार ८११ विना मास्क प्रवाशांकडून ८ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.