मुंबई : मध्य रेल्वेने आरआरबी परीक्षेच्या परीक्षार्थींची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता नागपूर आणि मडगावदरम्यान आरआरबी परीक्षा विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे. आता या ट्रेन महाराष्ट्रातील विविध स्टेशनवर थांबणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१०६३ आरआरबी परीक्षा विशेष गाडी नागपूर येथून उद्या सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि मंगळवारी मध्यरात्री १ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
आरआरबी परीक्षा विशेष गाडी : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०६४ आरआरबी परीक्षा विशेष गाडी बुधवारी मडगाव येथून दुपारी ३ वाजता सुटेल आणि गुरुवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. या दोन्ही आरआरबी परीक्षा विशेष गाड्या वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन, पुणे, सातारा, मिरज, बेळगावी आणि लोंडा स्थानकावर थांबणार आहे.