मुंबई -मुंबई शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख रेल्वे स्थानक म्हणजे दादर रेल्वे स्थानक आहे. स्थानकाच्या पूर्वेकडे पादचारी पुलाशेजारी असलेल्या ७० वर्ष जुने हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. हे मंदिर बेकायदेशीर असल्याने तत्काळ हटवण्याची गरज आहे. मध्य रेल्वेने यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम मंदिर प्रशासनाला दिला आहे. रेल्वेच्या या नोटीसमुळे भाजपा शिवसेना आता आमनेसामने आली आहे.
मंदिरावरून वाद पेटणार..?
मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांपैकी दादर स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकाला मध्य आणि पश्चिम रेल्वेची जोडणी आहे. मुंबई-पुणे जाणाऱ्या खासगी बस आणि राज्य परिवहनच्या गाड्यांचा अधिकृत थांबा स्थानकापासून जवळ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या स्थानकांवर गर्दी असते. स्थानकाच्या पूर्वेकडे पादचारी पुलाशेजारी असलेल्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर हनुमान मंदिर हे रेल्वेच्या जागेवर बेकायदेशीर बांधण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. या मंदिरामुळे प्रवाशांच्या वर्दळीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच रेल्वे स्थानकाशेजारी विकासकामे करण्यासाठी मंदिरामुळे अडथळे येत आहे. रेल्वेने याआधीही हे मंदिर बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. आता ही नोटीस मिळाल्यानंतर पुढील ७ दिवसांत या मंदिराची जागा रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावी. अन्यथा रेल्वे प्रशासन बळाचा वापर करून मंदिर हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, रेल्वेच्या या नोटीसवरून वाद पेटणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
'रेल्वे प्रशासन भावना शून्य'