मुंबई :मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून डाऊन दिशेला जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या एसी लोकलच्या काही गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला ( Some of AC Local Trains Technical Failure ) आहे. या बिघाडामुळे तीन एसी लोकल, नॉन एसी म्हणून चालवल्या जाणार आहेत. त्यांची दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा त्या एसी लोकल म्हणून सुरू ( Some of AC Local Trains Going Down Experienced Technical Failure ) राहतील.
Central Railway Information : तीन एसी लोकल, नॉन एसी लोकल म्हणून आज चालवल्या जाणार : मध्य रेल्वेची माहिती - Three AC Locals to be Operated as Non AC Locals
मुंबईच्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून खालील दिशेला जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या एसी लोकलच्या काही गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड ( Some of AC Local Trains Technical Failure ) झाला आहे. या बिघाडामुळे तीन एसी लोकल, नॉन एसी म्हणून चालवल्या जाणार आहेत. त्यांची दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा त्या एसी लोकल म्हणून सुरू राहतील. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल जैन दिली ( Anil Jain Chief Public Relations Officer Central Railway ) आहे.
एसी लोकल आणि नॉन एसी लोकल याबद्दल दोन वर्गांमध्ये विभागणी :मध्य रेल्वेमध्ये एसी लोकल सुरू झाल्यामुळे एसी लोकल आणि नॉन एसी लोकल याबद्दल दोन वर्गांमध्ये विभागणी झाली. ज्यांना एसी लोकलचे भाडे परवडते. त्यांना एसी सुखकारक वाटते. पण, ज्यांना एसी लोकलचे भाडे खूप जास्त वाटते, त्यांची मागणी आहे की एसी लोकांचे भाडे कमी करावे. सामान्य लोकलप्रमाणे ते असले पाहिजे. तसेच एसी लोकल रद्द करा, ह्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनदेखील केले होते. आज सकाळी अचानक तीन एसी लोकलच्या आतमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेने या तीन एसी लोकल आता नॉन एसी लोकल म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला.
तीन एसी लोकल आजच्या पुरता नॉन एसी :एसी लोकलच्या मोटरमन आणि गार्ड यांच्याकडून तांत्रिक बिघाडाबाबत मध्य रेल्वेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यामुळे 3 एसी लोकल आजच्या पुरत्या नॉन एसी म्हणून चालतील. यामध्ये सामान्य जनता सामान्य भाड्यासह प्रवेश करू शकेल आणि प्रवासदेखील करू शकेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी ई-टीव्ही भारतला दिली आहे.