मुंबई- ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त (On the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's death anniversary) अभिवादन करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने मुंबईत (Mumbai) येतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने (Central Railway) पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway Route) रविवारी होणारा मेगाब्लॉक (Mega Block) रद्द केला आहे. त्यामुळे अनुयायांना चैत्यभूमी (Chaityabhumi) येथे जाता येणार आहे.
Mahaparinirvan Din : चैत्यभूमीवर जाण्याचा मार्ग सुकर, मेगाब्लॉकबाबत रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय - वसई रोड ते विरार स्थानक
कोरोना नियमांचे (Covid 19 Rules) पालन करून यंदा मुंबईतील (Mumbai) चैत्यभूमीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी होणारा मेगाब्लॉक न घेण्याचा (No megablocks on Central, Western Railway) निर्णय घेतला आहे.
गर्दीच्या नियोजनासाठी मेगाब्लॉक नाही
दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. मात्र, मागील वर्षी कोरोनामुळे अनुयायांना चैत्यभूमी येथे जाता आले नाही. यंदा कोरोना नियमांचे (Covid 19 Rules) पालन करून अनुयायांना अभिवादन करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे रविवारपासून चैत्यभूमी येथे अनुयायांची गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची पावलं उचलली आहेत. गर्दीचे विभाजन करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण (CSMT to Kalyan) विभाग आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल (CSMT to Panvel) या दोन्ही उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने (Central Railway Administration) दिली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकाली ब्लॉक
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चैत्यभूमीला जाणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेवर उद्या दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल. तर, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री वसई रोड ते विरार (Vasai Road to Virar) दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी रात्री 3 वाजेपर्यंत असा 3:30 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकच्यावेळी वसई रोड ते विरार स्थानकादरम्यान (Vasai Road to Virar Station) अप फास्ट मार्गावर रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची दुरुस्ती व देखभाल केली जाणार आहे.