महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मध्य रेल्वे पार्सल गाड्या चालवणार - mumbai news

कोरोना विषाणूच्या प्रासारामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी मध्य रेल्वेने पार्सल गाड्याची वाहतूक सुरू केली आहे.

central-railway-department-has-started-transporting-essential-goods
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मध्य रेल्वे पार्सल गाड्या चालवणार

By

Published : Mar 28, 2020, 11:13 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प करण्यात आली आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वे विभाग पुढे आला आहे. वैद्यकीय पुरवठा, उपकरणे व भोजन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मध्य रेल्वेने पार्सल गाड्यांची वाहतूक खुली केली आहे.

या पार्सल गाड्यांमधून लहान पार्सल आकारातील वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. इच्छुक पार्टीला आवश्यक नोंदणी करण्यासाठी पार्सल कार्यालय आणि विभागीय कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. मर्यादीत नियमांनुसार पार्सल गाड्यांद्वारे पॉईंट टू पॉईंट ही वाहतूक सुरू असेल.

मध्य रेल्वेने खालीलप्रमाणे पार्सल गाड्या चालविण्याचा घेतला निर्णय -

अ) कल्याण ते नवी दिल्ली

ब) नाशिक ते नवी दिल्ली

क) कल्याण ते संतरागाची

ड) कल्याण ते गुवाहाटी

ABOUT THE AUTHOR

...view details