मुंबई -अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने 19 ऑक्टोबर पासून दररोजच्या विशेष उपनगरी सेवांची संख्येत 225 उपनगरीय गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वे गाड्यांची एकूण संख्या 706 इतकी होणार आहे.
राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केल्यानुसार मध्य रेल्वे सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी 481 विशेष उपनगरी सेवा चालवित आहे.
मुख्य मार्गावर (मेन लाइन) 499 गाड्या धावत आहेत. त्यात धिम्या मार्गावर 309 आणि जलद मार्गावर 190 फेऱ्या होत आहेत. तर हार्बर लाइनवर 187, ट्रान्सहार्बर लाइनवर 20 फेऱ्या सुरू आहेत. रेल्वेंची संख्या वाढविल्याने मध्य व हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.