मुंबई - 2019 च्या राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीकरिता युतीतील घटक पक्षांना काही जागा सोडण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आरपीआयला मुंबईतील एकही जागा सोडली नसल्याने आरपीआय नेते व समर्थक नाराज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी घाटकोपर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच आरपीआयला मानखुर्द शिवाजीनगरच्या जागी महामंडळ किंवा विधानपरिषद मिळणार असल्याचे सांगितले.
मानखुर्द शिवाजीनगर ऐवजी महामंडळ किंवा विधानपरिषद मिळणार - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा विश्वास - SHIWAJINAGAR ASSEMBLY
शिवसेनेने मानखुर्द शिवाजीनगरची जागा सोडली नाही. त्यामुळे मुंबईत व राज्यात मोठ्या प्रमाणात युतीवर आरपीआयचे नेते समर्थक नाराज असल्याचे मतं खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तर राज्यात व मुंबईत पक्ष आणि कार्यकर्ते महायुतीच काम करणार असून 220 ते 240 जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील शाहिद स्मारक मधे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म परिषद आयोजित करण्यात आली. यानंतर आठवले यांनी आरपीआयला मुंबईत एकही जागा न दिल्याने नेते आणि कार्यकर्ते नाराज असून मानखुर्द शिवाजीनगरची जागा शेवटपर्यंत देण्यात येईल, असे भाजप व शिवसेनेकडून सांगण्यात आले. पण शिवसेनेने मानखुर्द शिवाजीनगरची जागा सोडली नाही. त्यामुळे मुंबईत व राज्यात मोठ्या प्रमाणात युतीवर आरपीआयचे नेते समर्थक नाराज असल्याचे मतं खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तर राज्यात व मुंबईत पक्ष आणि कार्यकर्ते महायुतीच काम करणार असून 220 ते 240 जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आरपीआयला शिवसेना आणि भाजपने काही महामंडळ आणि विधापरिषदेच्या जागा देण्याचे मान्य केले असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.