महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाबाहेर मोठा बंदोबस्त, नारायण राणे घेणार का दर्शन? - केंद्रीय मंत्राी नारायण राणे

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून सुरू होत आहे. राणे हे दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र या अगोदरच शिवसेनेने राणे यांना इशारा दिला आहे. आज राणे यांचे मुंबईत आगमन झाले आहे,

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

By

Published : Aug 19, 2021, 11:17 AM IST

Updated : Aug 19, 2021, 11:42 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून देशभरात 'जन आशीर्वाद' यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राणे हे दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र या अगोदरच शिवसेनेने राणे यांना इशारा दिला आहे. आज राणे यांचे मुंबईत आगमन झाले आहे, त्यांच्या या जनआशीर्वाद यात्रेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दादादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही असे ट्विट त्यांनी बुधवारी केले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळ परिसरात लावण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुंबई विमानतळ येथून याठिकाणी येणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाबाहेर मोठा बंदोबस्त
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यात टिचर्स कॉलनी, शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते दादर येथील ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. त्यानंतर वीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथे दर्शन घेणार आहेत. महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, लालबागचा राजा येथे जाऊनही ते दर्शन घेणार आहेत. उद्यापासून नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल आणि 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग येथे त्याची समाप्ती होईल. मुंबई शहर उपनगर, वसई विरार, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग असा या यात्रेचा प्रवास असणार आहे.

हेही वाचा - भाजपाची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण, संजय राऊत यांची टीका

Last Updated : Aug 19, 2021, 11:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details