महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चर्मोद्योग विकासासाठी 100 कोटीच्या उद्योग समुहास केंद्र सरकारची मान्यता - मंत्री सुरेश खाडे - मेगा लेदर फुटवेअर अॅन्ड अॅक्सेसरीज क्लस्टर योजना

चर्मोद्योगास नवीन चालना देण्यासाठी तसेच चर्मकार समाजाच्या विकासासाठी हा प्रकल्प अतिशय मोलाचा ठरणार आहे, असे सुरेश खाडे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

By

Published : Sep 20, 2019, 11:47 PM IST

मुंबई - केंद्र सरकारच्या मेगा लेदर फुटवेअर अॅन्ड अॅक्सेसरीज क्लस्टर या योजनेंतर्गत राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 50 एकर क्षेत्रावर लेदर क्लस्टर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

हेही वाचा -'एका टाळीसाठी 86 मतदारसंघातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अमेरिकेला विकले'

केंद्र सरकारच्या मेगा लेदर फुटवेअर अॅन्ड अॅक्सेसरीज क्लस्टर या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मार्फत राज्यांमध्ये क्लस्टर प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे 50 एकर जमीन पट्ट्यामध्ये सदर लेदर क्लस्टरची योजना राबविण्याचे प्रस्तावित होते. या प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव सुमारे 100 कोटी रुपयांचा असून यात चामडे पादत्राण व संबंधित वस्तुंच्या उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्राची सुविधा उभारण्यात येणार आहे. यामुळे चर्मोद्योगाच्या विकासासाठी चालना व गती मिळणार आहे, असे खाडे यांनी सांगितले.

हेही वाचा -धुळे-सोलापूर रस्ता चौपदरीकरणाच्या भूसंपादनात 3 हजार कोटींचा घोटाळा - विजय वडेट्टीवार

पादत्राणाची देशांमध्ये वाढीव मागणी असली तरी पादत्राण आयातीमधूनच मागणीची पूर्तता होते व त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेचे बरेच नुकसान झाले आहे, यावर आळा घालण्यासाठी व चर्मोद्योगास नवीन चालना देण्यासाठी तसेच चर्मकार समाजाच्या विकासासाठी हा प्रकल्प अतिशय मोलाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक लहान मोठ्या चर्म उत्पादन कारखानदारांना अनेक सुविधा उपलब्ध होतील व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती खाडेंनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details